कर्जत प्रतिनिधी ; (प्रफुल जाधव) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलिस ठाणे यांच्या कडून जनतेच्या विश्वासातील शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नेरळ बाजारपेठ आणि परिसरात नेरळ पोलिसांनी रुठ मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आला.
नेरळ पोलिस ठाणे अंतर्गत ६० गाव व वाड्यानचा समावेश आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जनतेच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये म्हणून नेरळ पोलिसांनी रुट मार्च काढल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस उप अधीक्षक टी टी टेले, प्रभारी पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हा रुट मार्च काढण्यात आला.
नेरळ पोलिस ठाणे येथून कर्जत कल्याण रोड मार्गे ग्रामपंचायत कार्यालय नेरळ व ब्राम्हण आली, लोकमान्य टिळक वाचनालय, शिवाजी महाराज चौकातून नेरळ खांदा मार्गे रुट मार्च काढण्यात आला.


Post a Comment
0 Comments