कर्जत तालुक्यातील सांगवी गावाजवळील एका आलिशान फार्म हाऊस वरती बनावट सिगारेट कारखान्यावरती छापा मारण्यात आला.
कर्जत प्रतिनिधी .. कर्जत तालुक्यातील सांगवी गावाजवळील एका आलिशान फार्म हाऊस मध्ये भक्कम तटबंदी मध्ये सुरू असलेल्या बनावट सिगारेटच्या कारखान्यावर रायगड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून तब्बल पाच कोटींचा बनावट माळ जप्त करत पोलिसांनी 15 आंतरराज्य आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत, तर हे आरोपी आंध्रप्रदेश उत्तर प्रदेश, झारखंडसह, विविध राज्यांची संबंध असल्याचे समोर आले आहे.
संरक्षण भिंत आणि तटबंदी मुले फार्म हाऊस च्या आत मध्ये काय काय सुरू आहे हे बाहेरून पाहणे अशक्य होते. पोलिसांनी मुख्य दरवाजा उघडण्याचा आदेश दिला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी थेट भिंतीवरून आत प्रवेश केला. आत मध्ये तब्बल 15 कामगार मोठमोठ्या मशीन वरती बनावट सिगारेट उत्पादन करताना रंगेहात पकडण्यात आले.
हा कारखाना विजय ऐवजी जनरेटरवर चालविण्यात येत होता. जेणेकरून बाहेरून कोणालाही संशय येऊ नये म्हणून, या कारखान्यात कच्चामाल देखील मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आलेला आढळून आला. हा मुद्यमान पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कुमार विश्वकर्मा (मध्य प्रदेश,), कम्मारी राजेश्वर (तेलंगणा), लेक राम सोनी (छत्तीसगड), मोहम्मद बशीर ( तेलंगणा), नारायण सूर्यनारायण (तेलंगणा), सिद्धार्थ कोल्हटकर (महाराष्ट्र), मनोहर खांडेकर ( महाराष्ट्र), युसुफ शेख (महाराष्ट्र), कैलास कोल्हटकर (महाराष्ट्र), दुर्गाप्रसाद अनुसूरी (आंध्र प्रदेश), रवी पिथानी (आंध्र प्रदेश), मनीकंटा लावीटी (आंध्र प्रदेश) हरिप्रसाद चाकनी (तेलंगणा), सोहेल सिंग (उत्तर प्रदेश), हरीश मौर्या ( उत्तर प्रदेश), मी सनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे, अधिक तपास पोलीस करत आहेत की हे बनावट सिगारेट कुठे पाठवले जात होते कारखाना चालवणारा मालक कोण आहे आणि कच्चामाल नेमका कुठून येत होता. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment
0 Comments