घटस्थापना दिनाच्या निमित्ताने दीं.३ रोजी. शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल डिकसल येथे अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थी यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व डोळे तपासणी, बी.एम.आय, आय ब्ल्यंड नेस, वजन, आदी तपासणी करण्यात आली.
अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, यांच्या वतीने शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल डिकसल येथील शाळेतील २५२ विद्यार्थी व १३ शिक्षक आणि २ मावश्या यांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासणी केली, या मध्ये. मुलांचे डोळे तपासणी करून ज्यांना चष्म्याचे नंबर असतील त्यांना नंबर देऊन मार्गदर्शन केले. बॉडी चेकअप, वजन, आय, ब्ल्यंड.नेस, बी.एम.आय. या शिबिरात करण्यात आले.
शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन सूरज ठाकूर सर यांनी मुलांना खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून ,मुलांना आपल्या शरीराची, डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या वर मार्गदर्शन केले.
या वेळी प्रिंसिपल ठाकूर मॅडम, ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे, कर्जत लाईव्ह चे संपादक. किशोर गायकवाड संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव ,डॉक्टर विशाल बनसोडे व सहकारी हेल्थ अडवायझर डॉक्टर संजय सिंग उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments