Type Here to Get Search Results !

वाढदिवसाच्या निमित्ताने रा.जि.प. शाळा बेकरे वाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप....

कर्जत प्रतिनिधी. (संतोष पवार).
  रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरे वाडी शाळा येथील विद्यार्थी यांना संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख संतोष थोरवे यांच्या पुढाकाराने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले..
    अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने आज कर्जत तालुका संपर्क प्रमुख संतोष थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरे वाडी येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले..
      माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकरे वाडी शाळा येथे संतोष थोरवे यांचा वाढदिवस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेत केक कापून, त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थी यांना वेफर्स, चॉकलेट, केक, तसेच त्यांना खाऊ देऊन, शालेय उपयुक्त साहित्य पेन, वाह्या, रबर, पट्टी, सिसपेन्सिल, शॉपनर,कंपोस, वाटप तसेच अल्पउपोहर करण्यात आले.

      यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आहिरे सर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, जिल्हा सेल अध्यक्ष कृष्णा पवार, जिल्हा सदस्य संतोष पवार, तालुका सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, जूनैद पटेल, संतोष सकपाळ, विकास सांबरी. लक्ष्मण डायरे आदी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments