Type Here to Get Search Results !

संघटनेचे कार्यकर्ते रुपेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा भुतीवली येथे शैक्षणिक साहित्य वाटप.


      कर्जत. प्रतिनिधी... कर्जत तालुक्यातील आसळ ग्रामपंचायत हद्दीतील भुतीवली रायगड जिल्हा परिषद शाळा येथे साजरा करण्यात आला वाढदिवस.
  अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया. कर्जत तालुका महासचिव रुपेश कदम यांचा वाढदिवस रा. जि. प.शाळा भुतीवली शाळेत आनंदात साजरा करण्यात आला.
  वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना खाऊ व शालेय उपयुक्त शैक्षणिक साहित्य वह्या,पुस्तकं , पेन, पेन्सिल,वाटप करण्यात आले, या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा होता. मनाला समाधान वाटते असा वाढदिवस साजरा करून असे मत सचिव रुपेश कदम यांनी काढले.


 संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्य राबविले जातात त्यातच वाढदिवसाचे कार्यक्रम ही शालेय विद्यार्थी यांच्या सोबत राबवले जातात.. यावेळी शालेय मुख्याध्यापक यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्या दिल्या.या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, महासचिव रुपेश कदम, सदस्य मंगेश पडवळ, संतोष पवार, कृष्णा पवार शांताराम मिरकुटे, अन्य उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments