Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद संघटनेकडून मार्गदर्शन शिबिराचेआयोजन...

 

प्रतिनिधी .. (कृष्णा पवार). अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आज रानसई वाडीत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

      खालापूर तालुक्यातील शिरवली हद्दीतील रानसई वाडीत संघटनेची बैठक घेण्यात आली होती यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांनी तेथील स्थानिक नागरिकांना दिलासा देऊन संघटने बद्दल माहिती दिली, नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जन जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी उपाय योजना करण्यात याव्या. समस्यांना सामोरे जावे घाबरु नका, आणि जास्तीत जास्त संख्येने संघटनेत सामील व्हा असे आव्हान प्रदेश अध्यक्ष यांनी केले आहे. 

     या तालुक्यात आपला समाज कुठे तरी मागे राहिला असून आणि तो घाबरला सुद्धा आहे त्याला पुढे असे नेता येईल याचा विचार करायला लागणार आहे असे जिल्हा सेल अध्यक्ष कृषा पवार यांनी वाडीतील नागरिकांची बोलताना सांगितले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, जिल्हा सेल अध्यक्ष कृष्णा पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments