प्रतिनिधी.... कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवारी बाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. परंतु या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकी बाबत आढावा बैठक घेतली. आगामी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक२०२४ करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली.
कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाकरता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. असल्याचे आदेश देण्यात आले.
कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आढावा बैठक घेऊन उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कामाला लागावे असे आदेश पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची अधिकृत घोषणा माजी मुख्य मंत्री, पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली...
यावेळी जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका अध्यक्ष उत्तम कोळंबे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत विधानसभा अधिकारी एड संपत हडप, खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख, कर्जत शहर प्रमुख निलेश घरत, माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव, माजी संपर्क प्रमुख, माजी नगरसेवक प्रसाद सावंत, युवा सेना तालुका चिटणीस कल्पेश खडे, युवासेना उपतालुका पंकज म्हसे, किशोर दळवी, उपरोली विभाग अधिकारी संदेश अजारे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments