Type Here to Get Search Results !

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर...


 प्रतिनिधी ; बदलापूर येथील घटनेचा बदलापुरात व संपूर्ण महाराष्ट्र भारत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.त्यातच मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने २० ऑगस्ट २०२४ रोजी बदलापूर शहरातील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार घटनेतून संपूर्ण शहर हादरले होते.
       या प्रकरणातील शालेय कर्मचारी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. मात्र या घटनेचा तीव्र पडसाद उमटले आणि नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन वर १० तास रेल रोको आंदोलन सुरू केले. त्वरित सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरू करण्याची काम सुरू झाले.
     या घटनेत आरोपीला अनेक तपासण्यात सामोरे जावे लागत असल्याने जेव्हा आरोपी अक्षय शिंदे याला  रिमांड साठी तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास जवळ पोलिसांशी झटपट झाली,आरोपीने  पोलिसांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरवर ताबा घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या वर गोळी बार केला.तीन गोळ्या झाडण्यात आल्या.        त्यातील एक गोळी मोरे यांच्या पायात घुसली तर दोन गोळ्यांचा वेध चुकला, याच परस्तिथित जखमी पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांनी धाडस दाखवत प्रतिउत्तर दिले. तर दुसरे अधिकारी पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. दोन गोळ्या अक्षय शिंदे यांच्या डोक्याला व शरीरावर लागल्या दोघांनाही तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कलवा येथे दाखल करण्यात आले.
     माहिती नुसार आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला असल्याची खात्री लायक बातमी समोर आली आहे. मात्र पोलिसांकडून आद्यप या बाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या बाबत गृहमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अपल मत व्यक्त केले...

Post a Comment

0 Comments