कर्जत प्रतिनिधी; (गोविंद सांबरी).: नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कार चालकाने विद्यामंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारणे उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झालेली असून कु. मयुर मोहन पारधी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे तर कार चालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेरळ घाट रस्त्या वरील जूम्मापट्टी येथील धस वाडी येथील राहणारे कु. मयुर मोहन पारधी, कु.भगवान सखाराम पारधी, कु विशाल आलो दरोडा, हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असून नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास शनिवार दी.२१ सप्टेंबर रोजी७:३० च्या सुमारास कर्जत कल्याण राज्य मार्गावरून पाणी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे व त्यांची पत्नी व नऊ वर्षांच्या पुतण्या सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे त्यांची इरटिका कार एम एच ०५ सी वी २८३४ ने जाताना नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी कु मयुर पारधी, वय वर्ष १५ ,१० महिने इयत्ता ११ वी, कु विशाल दरोडा वय वर्ष १७,३ महिने इयत्ता १२ वी, कु भगवान पारधी वय वर्ष १७:०५ महिने इयत्ता १२ वी यांना धडक दिल्याने अपघात झाला आहे.
सदर अपघातातील शाळकरी मुलांना प्रथम उपचारासाठी नेरळ येथील डॉ. शेवाळे कडे नेले असता, त्यांना पुढील उपचा रकरीता बदलापूर येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर कु मयुर मोहन पारधी यांना डोंबिवली येथील एम एस रुग्णालयात नेण्यात आले आता उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी गाडी व चालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असून नेरळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चालक लोचन धुरी यांनी सुरवातीपासूनच या अपघातात समंज्यसाची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे कबूल केल्याचे व लोचन यांची पत्नी जखमी तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी स्वतः हुन सोबत गेल्याची माहिती समोर येत आहे..

Post a Comment
0 Comments