Type Here to Get Search Results !

बार्डी येथील तरुणाने घेतले भरघोस उत्पन्न.. सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी...


 कर्जत प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील बार्डी येथील तरुण हेमंत कोंडीलकर याने सेंद्रिय पद्धतीने भेंडी ची लागवड केरून   घेतले भरघोस उत्पादन .

        भिवपुरी स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर बार्डी या गावातील तरुण हेमंत कोंडीलकर यांनी वारंवार रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय शेती पद्धतीची निवड केली आणि त्या द्वारे जमिनीच्या सुपिकतेला प्रोस्थान दिले. त्याच्या या शेती विषयक मेहनत आणि नव्या प्रयोगामुळे अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याचा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांना समोर आणून ठेवला आहे.

        हेमंत हा अत्यंत मेहनती तरुण अंगात जिद्द, तळमळ, नवीन नवीन प्रयोग, करण्याची इच्छा, याने गावातील शेतकरी परशुराम चौधरी  यांच्या शेतात संकरित बियान्याची लागवड केली आहे. 

    त्याने जुलै महिन्या पासूनच भेंडीच्या  लागवडीची आवक सुरू केली. रोपांच्या मुळाजवळ हिरव्या गवतांचे आच्छादन केले, त्यानंतर दर पंधरा दिवसांनी तो त्याने स्वतः बनवलेल्या डीकंपोजर कल्चर, देशी गायीच्या पंचगव्यापासून ते पाण्यात मिसळून त्याचा त्याला या लागवडी साठी मोठ्या प्रमाणात वाढ व फायदा झाला आहे.

    हेमंत यांनी बनवलेले सेंद्रिय खत तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून खरेदी देखील केली जात आहे. या खतामुळे शेतकऱ्याला देशी गाईचे महत्त्व पटऊन  देण्यासाठी  प्रयत्न केले जाते. कोंडीलकर यांनी कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते.

      हेमंत कोंडीलकर यांचा हा  यशस्वी प्रयोग स्थानिक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीतून घेतलेले भेंडीचे उत्पन्न त्यांच्या गुणवत्तेमुले  बाजारात चांगल्या भावाने विक्री केली जात आहे.

Post a Comment

0 Comments