प्रतिनिधी कर्जत ; संघटनेच्या सदस्य संतोष सकपाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमातील मुलींना जेवण व शैक्षनिक साहित्य वाटप..
नेरळ जवळील धामोते येथील साई बाबा मंदिर शेजारील आगरी समाज हॉल, शेजारील आसरा अनाथ मुलींचा आश्रमात अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या तालुका सदस्य श्री संतोष सकपाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गेली अनेक वर्षे या आश्रमात मुली राहतात, त्यानंतर जवळच्या शाळेत शिक्षण घेऊन शिक्षण पूर्ण करतात.
अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या वतीने तालुक्यात अनेक ठिकाणी समाजकार्य, यांसारखे कार्यक्रम राबवले जातात. त्यातच संघटनेच्या तालुका सदस्य संतोष सकपाळ यांचा वाढदिवस देखील आज या आश्रमात जाऊन साजरा करण्यात आला.
यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथील मुलींना जेवण, व शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
आगरी समाज हॉल च्या समोरच आसरा मुलींचा आश्रम आहे. या ठिकाणी समाजातील अनाथ मुलीचा संघोपन करून त्यांना शिक्षण देऊन स्वतः च्या पायावर उभे करण्याचे काम आसरा अनाथाश्रम करीत असते. याच आश्रमात राहणाऱ्या मुलींसाठी अ पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने तालुका सदस्य संतोष सकपाळ आणि पदाधिकारी यांनी भेट देऊन येथेच वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना जेवण, चिप्स, चॉकलेट, केक, व शैक्षनिक साहित्य देखील वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापिका सुवर्णा पिंगळे त्याच प्रमाणे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, तालुका संघटक संतोष थोरवे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, शेलू अध्यक्ष सत्यप्रकाश शर्मा, सदस्य विलास संबरी. उपस्थित होते...


Post a Comment
0 Comments