प्रतिनिधी. ; जालना ते वडीगोद्री मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रक मध्ये हा भयंकर अपघात झाला आहे.
या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली असून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघाताचे सत्र सुरू आहे. अश्यातच जालना मधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बस मध्ये ऐकून २५ते३०प्रवासी प्रवास करत होते.त्या मध्ये ५ते६ दगावल्याचे सांगण्यात येत असून अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मृतांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहन चालकांचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.

Post a Comment
0 Comments