कर्जत प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील मतदार संघातील असंख्य गावांसह वाड्या पाड्यांवर अनेकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जनांस मुबलक पाणी मिळावा म्हणून वेलोवेली शासन दरबारी पाठपुरावा करीत असताना न्याय न मिळाल्याने अनेक जण हातबल झाल्याने मतदार संघात पहावयास मिळत असताना असंख्य गावांची तहान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी बोरवेल मारून पाणीपुरवठा करत तहान भागविली.
आपण समाजाचा काहीतरी देना लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मी आजवर केले आहे. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या तत्त्वानुसार मी आज पर्यंत कार्यरत आहे. यापुढेही अशेच समाजात कार्यरत राहील. महिला वर्गाच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचाही मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पुन्हा एकदा खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चावणी ग्रामपंचायत हद्दीतील साकुचीवाडी मधील पाणीटंचाई नितीन सावंत यांनी बोरवेल मारून दूर केल्याने सावंत यांचं ग्रामपंचायत मध्ये व सकुची वाडी ग्रामस्थांकडून खूप कौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments