कर्जत प्रतिनिधी ; (प्रफुल जाधव); कर्जत तालुक्यात सध्या तरी अनेक ठिकाणी घरफोड्या चोऱ्या यांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच नेरळ गावातील सम्राट नगर भागातील साईनाथ सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणारे मोईनुद्दीन तय्यब अली मोमीन आणि त्यांचे कुटुंब गणेश उत्सवाची सुट्टी असल्याने आपल्या गावी बार्शी सोलापूर येथे गेले होते.
मोमीन दांपत्य कलंब येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेवर शिक्षक असून त्यांचे घर बंद करून कुटुंबीयांसह बार्शी सोलापूर येथे गेले होते. साईधाम इमारतीमधील त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी मोमीन यांना फोन करून त्यांच्या रूमचा दरवाजाची कडी तोडलेली आहे, तसेच बेडरूम मधील कपाट उघडे असून सामान असता व्यस्त पडलेले आहे अशी माहिती दिली प्रथम दर्शनी घरात चोरी झाल्याचं फिर्यादी मोमीन यांना कळविले त्याप्रमाणे मोमीन हे 11 सप्टेंबर रोजी आपल्या घरी आले आणि त्यानंतर घराची पाहणी करून चोरी झाली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे दिली.
फिर्यादी यांचे सोन्याचे सुमारे आठ तोले व चांदीचे 180 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम 85000 चोरीला गेली आहे. चोरीस गेलेले दागिने व लहान सहान वस्तू नक्की रोख रक्कम किती याची खात्री करून पोलीस ठाण्यात चोरी बाबत तक्रार दिली सदर गुण्याचे तपास कामी गुन्हा ओळखीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी धूळदेव टेले यांच्या मार्गदर्शनाखाली नेरल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे त्यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपास दिला.
पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांना सक्षम सूचना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार बेंद्रे आणि वागणे कर यांनी घटनास्थळी येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता रात्रीच्या वेळी हातात लोखंडी कटावणी घेऊन तरुण जात असल्याचे दिसले त्यानंतर पुढील धागेदोरे चोरट्याचे नाव निष्पन्न झाले. धामोते आदिवासी वाडी मधील तरुण संजय नारायण दळवी अन्य दोन विधी संघर्षित बालके यांना ताब्यात घेतले यांनी तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली यास कर्जत न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे या कामगिरीबद्दल नेरळ पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकाऱ्यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments