Type Here to Get Search Results !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दिलेला शब्द पाळला,,, कर्जत मध्ये साकारणार भव्य दिव्य भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन...


 कर्जत प्रतिनिधी.. कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेन्द्र थोरवे. अतापर्यंत आमदारकी निवडून आल्यापासून तालुक्यात अनेक कामे पूर्ण केली, अनेक कोटींचे निधी कर्जत खालापूर तालुक्यासाठी उपलब्ध करून तालुक्यातील, गावातील समस्या सोडविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यातच आपल्या मतदार संघातील मतदारांना दिलेला शब्द पाळणारे एकमेव आमदार म्हणून आमदार महेंद्रसेठ थोरवे यांची वर्णी लागते.

  यातच आमदार साहेबांनी कर्जत   करांना दिलेला शब्द पाळला आहे. पाच कोटींचा निधी मंजूर करून कर्जत मध्ये भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करणार आहे. अशी घेषणा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केली आहे.

   या भवनाच्या चर्चे साठी आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील बाळासाहेब भवन जन संपर्क कार्यालयात  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत नगरपालिकेच्या हद्दीत कर्जत मुद्रे येथील नियोजित जागेत भव्य वास्तू निर्माण होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी ५,००,००,००० इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या डिजाईनची ppt सादर करण्यात आली आहे. या साठी नगरपालिकेच्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेऊन लवकरच भावनाच काम सुरू केले जाईल असा शब्द आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दिला...

Post a Comment

0 Comments