Type Here to Get Search Results !

दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक - महा उपासिका मिराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष - डॉ. भीमराव साहेब आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार - मा. बाळासाहेब आंबेडकर

कर्जत प्रतिनिधी. (प्रफुल जाधव)..बौध्द धम्माचा प्रचार करत, आवळस गाव येथे वर्षावास मालिका तिसरे पुष्प गुंफले गेले

    भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड संस्कार विभाग अंतर्गत ता. शाखा कर्जत यांच्या विद्यमाने, सालाबाद प्रमाणे या वर्षीही कर्जत तालुक्यातराबविण्यात येत आहे. विभाग क्र ९ श्रावस्ती बुद्धविहार आवळस येथे, वर्षावास मालिकेचे तिसरे पुष्प गुंफले गेले. 
       भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये बौद्धांची पवित्र स्थळे हा विषय होता तसेच या विषयाच्या प्रवचनकार वैशालीताई बोखरे ( केंद्रीय शिक्षिका ) या होत्या. त्यांनी बौद्धांची पवित्र स्थळे कोणती, त्या स्थळांची नावे तसेच भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसा बुध्द धम्माचा प्रसार केला तसेच त्यांनी कशी ज्ञानप्राप्ती झाली या सर्व गोष्टी पटवून सांगितल्या व आपण एकदातरी तिथे भेट दिली पाईजे असे लोकांना पटवून सांगितले. 
          कार्यक्रमाच्या वेळी ता. अध्यक्ष - प्रकशजी गायकवाड, ता. सचिव - भारतजी देसाई, ता. संस्कार अध्यक्ष - उल्हासजी जाधव, ता. कोषाध्यक्ष - अशोकजी गायकवाड, ता. संस्कार सचिव - श्यामजी जाधव, ता. संघटक - अनंताजी गायकवाड, ता. संस्कार सचिव - मारुती भालेराव, संतोषजी सोनावणे, सल्लागार हरिभाऊ गायकवाड, पत्रकार - सुनील जाधव, रमेशजी गायकवाड - वि. क्र. ४ अध्यक्ष तसेच विभाग क्र. ९ कमिटी, अजयजी जाधव - अध्यक्ष, संस्कार उपाध्यक्ष - दिपक जाधव, सरचिटणीस - दिनेश ढोले, कोषाध्यक्ष - दिगंबर जाधव, कार्यालयीन सचिव - प्रफुल जाधव, पर्यटन उपाध्यक्ष - नागेश गवळे, देवदत्त हिरे - विभाग क्र. ४ संघटक, संदेश जाधव - केंद्रीय शिक्षक आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नामदेव जाधव, दामू जाधव, संतोष जाधव, बबन घोडके, महादू जाधव, संजय जाधव, सुलोचना जाधव, नंदा गायकवाड, मारुती जाधव, दर्शना जाधव, मीना वाघमारे, विमल जाधव, कल्पना जाधव, कलावती जाधव, हौसाबाई जाधव, उर्मिला जाधव, वैशाली जाधव, वंदना जाधव,  प्रकाश जाधव, सूरज जाधव, सतीश जाधव, कमलाकर जाधव, श्रावण जाधव हे आवळस गावातील मान्यवर उपस्थित होते...


Post a Comment

0 Comments