कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने उपक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या एडवोकेट सौ पूजाताई सुर्वे त्यांच्या समवेत सहकारी च्या उपस्थितीत पार पडला ग्रामपंचायत पलदरी हद्दीतील सर्व शाळांमध्ये राजमाता जिजाऊ फाउंडेशन तर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त निबंध स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
एडवोकेट सौ. पुजाताई सुुर्वे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाबद्दल माहिती देऊन उपस्थित मुलामुलींना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे निबंध स्पर्धेतील विजेत्या मुला मुलींना रोख रक्कम बक्षीस व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. ठाकुरवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले त्यांच्या या कार्याचे सर्वत्र ठिकाणी कौतुक केले जात आहे.


Post a Comment
0 Comments