Type Here to Get Search Results !

उ.बा.ठा.गटाचे नितीनदादा सावंत भावी आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन ...


कर्जत प्रतिनिधी..शिवसेनेचे भावी आमदार नितीन दादा सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताननें  अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत खालापूर मतदार संघात अनेक विकास कामे केली. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार होण्याआधीच स्वखर्चाने अनेक वाडी वस्तीतील   व पाण्याच्या समस्या दूर केल्या, रस्त्याचा समस्या. शिवसेनेच्या संकटकालातही शिवसेनेची साथ सोडली नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय शैक्षणिक साहित्य वाटप. छत्र्यांचे वाटप. नगर परिषदेच्या रेनकोट वाटप. त्याचप्रमाणे   तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. राजकारण हे केवळ सत्ता आणि कुरघोडीचे मैदान नाही. जनसेवेची महत्वाची साधना आहे.  बाळासाहेब ठाकरे यांचे विचार  यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नितीन दादा सावंत यांनी आपल्या मतदारसंघात खूप विकास कामे केली आहेत.
     वाढदिवसाच्या निमित्ताने कशेले कोल्हारे येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कर्जत रॉयल गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होईल.  शिक्षण हे  समाजाच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे  याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम आयोजित केले आहेत. 
       नितीनदादा सावंत यांना कर्जत खालापूर मतदारसंघातून अनेक आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांकडून सुभेच्यांचा वर्षाव केला जात आहे. त्यांचे चाहते, कार्यकर्ते असंख्य संख्येने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा संपर्क कार्यालय मध्ये उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments