कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव).. ओम साई गणेश अपंग कल्याण संस्थेच्या वतीने आज कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्जत मधील दिव्यांग व विधवा महिलांना गेली ३ वर्षांपासून त्यांची हक्काची पेंशन प्रलंबित आहे या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक महिला व दिव्यांगाणा त्यांच्या मूलभूत गरजा, अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संजय गांधी विभागात चौकशी साठी गेलेल्या महिला भगिनींना व आमच्या सहकाऱ्यांना अरेरावी उडवा उडविची उत्तरे दिली जात आहेत.
दिव्यांग पेन्शन साठी लागणारे दाखले असून देखील पेन्शन दिली जात नाही. अनेकांना दिव्यांग व्यक्ती, महिला यांना मोल मजुरी करावी लागत आहे आणि तरी देखील यांना त्यांच्या हक्काची पेन्शन दिली जात नाही. महिलांच्या समस्या गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, तरी देखील प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे, हे प्रशासनाचे नि सवेदनशिल वर्तन अत्यंत निंदनीय आहे.
ओम साई गणेश अपंग कल्याण संस्थेने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. अन्यथा जर या समस्येचे निवारण झाले नाही तर उपोषण करू असे संस्थेच्या अध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरून उत्तर दिले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्यात यावी, असे आव्हान करण्यात आले आहे.. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिव्यांग व विधवा महिला यांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
महिलांच्या पेन्शन प्रकरणी प्रशासनाने हलगर्जी पणामुळे समाजातील दुर्बल घटकांचे जीवन आर्थिक कठीण झाले आहे. या गंभीर परस्तीथिवर प्रशासनाने लक्ष द्यावे व महिला आणि दिव्यांगाणा न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने या बाबत तातडीने कार्यवाही न केल्यास समजात असंतोष निर्माण होऊ शकतो. ओम साई गणेश अपंग कल्याण संस्था महाराष्ट्र यांचे वतीने अध्यक्ष अमर साळोखे, सचिव- पंकज भोइर, लहू डायरे, मानिवली विभाग अध्यक्ष, राजेंद्र बदे, धनाजी हडप, महेंद्र वेशिकर, समीर राऊत, विनय शासाने, महेंद्र गोमाने, ई संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते...


Post a Comment
0 Comments