Type Here to Get Search Results !

येशश्री शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख, यांस कठोर शिक्षा व्हावी म्हणून संघटनेने दिले पत्रक . महाराष्ट्र राज्य. गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना..

 

कर्जत प्रतिनिधी ; अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, संघटनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत येथून उपनिरीक्षक नारायण चव्हाण साहेब यांना पत्रक देण्यात आले.

    रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कु. यशश्री शिंदे या तरुणीची अत्यंत निर्दई पणे कृरतेने हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे हिच्यावर सुद्धा अत्याचार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच वेळी लगेचच कु. येशश्री शिंदे हिच्यावर सुद्धा कृरपने अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे जातीय सलोखा किवा तेड निर्माण होत आहे असे चित्र एकंदरीत दिसत आहे. त्यामुळे महिला व मुली असुरक्षित आहेत असे एकंदरीत महिलावर्गाला वाटत आहे.

   या घटनेचा निषेध म्हणून आज अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास पत्रक देऊन आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आणि येशश्री शिंदे या मुलीला न्याय मिळावा,ही भूमिका मांडावी, या हत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला, या घटनेमुले असे दिसत आहे की आज महाराष्ट्रातील मुली , महिला सुरक्षित नाहीत,,त्या मुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलिस उपनिरीक्षक श्री.नारायण चव्हाण साहेब यांना पत्रक देऊन ते पत्रक गृहमंत्री यांकडे सोपविण्यात यावे व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी म्हणून, या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, जिल्हा अध्यक्ष श्री विलास शिर्के जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, जिल्हा सदस्य संतोष पवार, शाम देशमुख, अशोक देशमुख, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments