कर्जत प्रतिनिधी. (प्रफुल जाधव). ठाणे जिल्हा अंतर्गत बदलापूर येथील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला, त्यात असंख्य लोक रस्त्यावर उतरले, पालक, कामगार, अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आरोपी अक्षय शिंदे या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या साठी राज्यात मोठी आंदोलने छेडण्यात आले.
बदलापूर येथील घटनेचा अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, यांच्या वतीने कर्जत पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक यांना आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी या साठी निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
बदलापूर येथील घटना निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीआहे, आरोपी अक्षय शिंदे या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून व सामान्य जनतेतून होत आहे त्याच्या निषेधार्थ बदलापूर व संख्या लोकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन वर धरणे आंदोलन सुरू केले. शासनाकडून दाखल घेण्यात आली.
जे कृत्य घडल ते खूप निंदनीय असे घडू नये या करता शासनाने की आयदे बनवायला हवेेअसे कायदे की या घटने सारखे पुन्हा घटना घडू नये. असे संघटनेच्या माध्यमातून पत्रात नमूद केले आहे. या वेळी कर्जत पोलिस स्टेशन येथे पत्र देताना संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, ह भ प वासुदेव महाराज बडेकर, समाज सुधारक प्रबोधनकार प्रवचन कीर्तनकार, जिल्हा सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, जिल्हा सदस्य संतोष पवार, तालुका सदस्य मंगेश पडवळ, वार्ड अध्यक्ष नरेश भोईर, गणपत हिंदोळा, ई उपस्थित होते.. या वेळी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला....

Post a Comment
0 Comments