Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस व विद्यार्थी व शिक्षक याची बैठक..

कर्जत प्रतिनिधी.... प्रफुल जाधव. कर्जत पोलिस ठाणे हद्दीतील शालेय विद्यार्थी यांच्या सुरक्षा च्या अनुषंगाने  कर्जत येथील डोने शाळा व शारदा मंदिर शाळा येथे २३ ऑगस्ट रोजी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक घोलप, महिला पोलिस शिपाई सुजाता पाटील, महिला पोलिस शिपाई स्वाती चिरमे, म. पोलिस शिपाई पूनम डोमे, यांची भेट घेऊन तेथील शिक्षक विद्यार्थी यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले या बैठकी प्रसंगी शाळेत येणारे विद्यार्थी हे खासगी वाहनाने प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मुलींच्या सुरक्षे करता शासनाने परिपत्रकानुसार उपाय योजना करण्यात, मुलींकडे महिला शिक्षक यांनी नियमित पणे त्यांना कोणी त्रास देतोय का या कोणी तुमचा पाठलाग करत आहेका याची माहिती देण्यात यावी. 

       शाळेच्या परिसरात सुरक्षे करिता सी सी टिव्ही बसवण्यात यावे, मुलांचे स्वच्छ ता गृह नेहमी चेक करून घ्यावेत, ते कसे स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी, व ते सुरक्षित आहेत याची दखल घ्यावी. मुलांना घेऊन जाणारे वाहन चालक यांची संपूर्ण माहिती घेणे व त्यांना मुलांचे सुरक्षा विषयक सल्ला वारंवार करणे, तसेच इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थी यांच्या सोबत मैत्री पूर्ण प्रश्र्नोतरी स्वरूपात गप्पा मारून गुड टच, ब्याड टच व अनोळखी व्यक्ती कडीन चॉकलेट घेऊ नये व त्यांच्या सोबत कुठेही जाऊ नये, नेहमी आई वडील दादा ताई यांच्या सोबत शाळेत यावे व जावे अशा सूचना कर्जत महिला पोलिस नाईक घोलप, पोलिस शिपाई सुजाता पाटील, पोलिस शिपाई स्वाती चिरमे, पो. शिपाई पूनम डोमे, यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना दिल्या..

Post a Comment

0 Comments