कर्जत प्रतिनिधी... कर्जत तालुक्यातील डोंगर पट्ट्यातील दुर्गम भागात वसलेली अासल वाडी, या जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 ऑगस्ट दिन आनंदात साजरा करण्यात आला.
अ
पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने, रायगड जिल्हा परिषद शाळा आसल वाडी येथे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळीकडे मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना अस्सलवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची प्रभात फेरी काढून गावामध्ये मुलांनी घोषणाबाजी करत आजूबाजूचा परिसर आनंदमय झाले. प्रभात फेरी पूर्ण झाल्यानंतर मुलांनी राष्ट्रगीत ध्वजा गीत सादर केले.
आमंत्रित अ पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने कर्जत तालुका महासचिव श्री रुपेश मनोहर कदम यांच्या पुढाकाराने मुलांना खेळाचे साहित्य कॅरम बोर्ड, क्रिकेटचे साहित्य, बॉल, दोरी उडी, लगोरी बॅडमिंटन, रबरी बॉल, फुटबॉल, अडी वाटप करण्यात आले. तर शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट रित्या भाषणे केली, संघटनेच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले, त्यानंतर शालेय विद्यार्थी व अंगणवाडीचे विद्यार्थी यांना बिस्किट व चॉकलेट देण्यात आले यावेळी शालेय कमिटीचे अध्यक्ष गोविंद सांबरी व मुख्याध्यापक तसेच शिक्षक आणि ग्रामस्थ महिला पुरुष उपस्थित होते त्याचप्रमाणे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक श्री ज्ञानेश्वर सालोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कुमार प्रफुल जाधव, तालुका महासचिव श्री रुपेश कदम, वार्ड अध्यक्ष ओंकार घरत, जिल्हा सदस्य संतोष पवार, युवक महिला अध्यक्ष प्राची जाधव, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, ता सदस्य विलास सांबरी, रमेश सांबरी, ग्रामपंचायत सदस्य बाळू सांबरी, ग्रामस्थ उपस्थित होते..



Post a Comment
0 Comments