उरण प्रतिनिधी.. उरण येथील येशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी दाऊद शेख याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. येशश्री शिंदे हिच्या हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा येथे नवी मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. नवी मुंबई पोलिसांनी साध्या वेशातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या.
गेल्या पाच सहा दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान येशश्री शिंदे प्रकरणातील एक जून सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. या फोटोमध्ये दाऊद शेख हा यशस्वी चा पाठलाग करीत असताना दिसत आहे 25 जुलै रोजी दुपारी 2:14 वाजता यशश्री स्टेशन रोड वरून उरण स्टेशन कडे जात असताना एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे या सीसीटीव्ही मध्ये साधारण 2:22 वाजता आरोपी दाऊद शेख त्याच मार्गाने यशस्वी च्या पाठीमागे जात असल्याचे दिसून आले आहे हप्त्याच्या दिवशी दुपारी यशश्रीच्या पाठलाग करत असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यशश्री शिंदे हिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता कारण तिची ओळख पटवण्यास कठीण जाईल म्हणून याशिवाय आरोपीने तिच्या गुप्त अंगानवरही वार केले होते छातीवर वार करण्यात आले होते काही अन्य ठिकाणीही वार करून गुप्त अंगांचे भाग कापण्यात आले होते इतक्या निर्दयी पणे तिची हत्या करण्यात आली या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू होता यशश्रीच्या आई-वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments