Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली लघु पाटबंधारा ओव्हरफ्लो


कर्जत प्रतिनिधी (मंगेश पडवळ) ; तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी व तेथील गावां सेजारील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी पाळी भुतीवली येथे बांधण्यात आलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्प हे पूर्णपणे भरून वाहत आहे.

      डोंगरातून येणारे पाणी अडवून ते शेतीसाठी तसेच पिण्यासाठी वापरले जाते. या धरणाच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई ची समस्या पासून मोकळा श्वास घेता येते,
  १०० एम एल डी क्षमता असलेले हे धरण पाणी व भुतीवली या गावांचे वीस्थापन करून बांधण्यात आले आहे. यावर्षी एक दोन आठवडे आधीच धरण  ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे नागरिक व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. या धरणाच्या बाहेरील ओव्हरफ्लो च्या पाण्यात पर्यटक खूप प्रमाणात आकर्षित होत असतात त्यामुळे तेथे बाहेरील शहरातील पर्यटक पर्यटनासाठी येथील ओव्हरफ्लो च्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी खूप प्रमाणात पसंती दर्शवतात.


Post a Comment

0 Comments