कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव). दीं.७ रविवार रोजी कर्जत तालुक्यातील आवलस येथे, भारतीय बौद्ध महासभा मीटिंग आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी नवीन कमिटी तयार करण्यात आली, नवीन पदाधिकारी नियुक्त करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्र.९ आयोजित करण्यात आली होती.
भारतीय बौध्द महासभेचे रायगड जिल्हा कमांडर बौद्धाचार्य आनंता गायकवाड तसेच भरत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पदे निवड करण्यात आली. विभाग क्र.९ चे अध्यक्ष अजय जाधव, सरचिटणीस दिनेश ढोले, कोषाध्यक्ष दिगंबर ढोले, संस्कार सचिव रामदास ढोले, संस्कार उपाध्यक्ष दीपक जाधव, कार्यालईन सचिव प्रफुल जाधव,यांना नियुक्त करण्यात आले.
या वेळी श्रावस्ति बुद्ध विहार आवलस येथे खालील ग्रामस्थ उपस्थित होते. बुद्ध भूषण मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, मंडळाचे उपाध्यक्ष बबन घोडके, नामदेव जाधव, महादेव जाधव, सचिन जाधव, रायगड जिल्हा कमांडर बौद्धाचार्य आनंता गायकवाड, भरत देसाई, यांच्या वतीने पदे नियुक्त करण्यात आली व पुढील त्यांच्या कार्यासाठी भरतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने शुभेच्या देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments