कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव).. कर्जत पासून ते भिवपुरी रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आषाणे गावा शेजारील हिरवेगार डोंगरात हा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनले आहे. मुंबई व अनेक ठिकाणावरून पर्यटक येथे शनिवार रविवार खूप मोठ्या संख्येने येतात.
कर्जत कल्याण राज्य मार्गालगत आषाणे गावाच्या मागील डोंगराळ भागात हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. डोंगरावरून पावसाचे पाणी त्यांचे तुषार ४० फुटावर झेलण्यासाठी पर्यटक वर्षासहलीच्या निमित्ताने येत असतात. भिवपुरी स्टेशन वरून पर्यटक डिकसल गावातून कर्जत राज्य मार्गावरून कर्जत च्या दिशेने उमरोली गावातून जात असतात, धबधबा कडे जाताना उमरोली गावाच्या शेजारी एक ओढा पार करावा लागतो, त्या नंतर पुढे जाऊन धबधबा चे निसर्ग दर्शन होते.
या धबधब्याचे वैशिष्ट म्हणजे धबधब्याचा डोह जेथे आहे तेथून तब्बल दीड की. मी. पाणी वाहून नेणाऱ्या ओढ्यात पर्यटक बसून पाण्याचा आनंद घेऊ शकतात. मात्र धबधब्याच्या मुख्य डोहात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात कोसळत असल्यामुळे पाण्यासोबत लहान मोठे दगडे वाहून येतात, त्या मूळ धोका निर्माण होऊ शकतो, अन्य पर्यटकाना या धबधब्यावर कोणत्याही ठीकाणी कुठलाही धोका नाही...
( प्रथमच आपल्या कर्जत मध्ये, नेरळ साई मंदिर शेजारी... सिनेमा हॉल. आपल्या सर्वांसाठी चालू झाला आहे. ऑनलाईन बुकींग साठी वरील नंबर वर संपर्क साधावा. युक्ती फन स्क्युअर..).


Post a Comment
0 Comments