कर्जत प्रतिनिधी..1 जुलै2024 सोमवार रोजी अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया, संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्ताने डिकसल येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे उस्थहात साजरा करण्यात आला.
संघटनेच्या माध्यमातून जाधव यांनी समाजात अनेक उपक्रम राबवत आपली एक आगळी वेगळी छाप पाडली आहे, नुकताच त्यांना त्यांच्या या समाज योगी कार्याबद्दल त्यांना "समाज रत्न"पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना प्रथम केक कापून नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्याच प्रमाणे मुलांचं हेल्थ चेकप करण्यात आले.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. मतिमंद मुलांची शाळा संस्थापक श्री दिलीप जेठे सर, व सहकारी. जनाई हॉस्पिटल चे डॉ. संतोष सदावर्ते यांचं आणि संघटनेच्या कार्यकर्त्याचे स्वागत करण्यात आले, या वेळी प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री विशाल बनसोडे, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, महिला युवक अध्यक्षा प्राची जाधव, ता सदस्य संतोष पवार, विष्णु कांबरी, श्रीराम पाटील, आली पठाण, वृषाली गायकवाड, वैभव तांडेल, पौर्णिमा कांबरी, आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments