पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणालाही फसवू शकत नाही, असे महाराष्ट्र राज्यातील जनता महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय राहणार नाही. असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी या सभेत व्यक्त केला. कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंवाद सभेचे आयोजन केले होते ते पुढे म्हणाले की, हे घटनाबाह्य सरकार पायउतार होत नाही तोपर्यंत मी त्यांना कायम घटनाबाह्य म्हणणार.
या सभेचे आयोजन किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्या वेळी बोलताना जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा पक्ष महाराष्ट्रात ९ वर येऊन ठेवला आहे. सर्व चमत्कार मतदान राजा करू शकतो असे सांगून महाविकास आघाडीचे सरकार म्हणून परिवर्तन करायचे आहे. या वेळी व्यासपीठावर उपस्थित शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही सभेला संभोदित केले. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे संघटक साजोग वाघेरे, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, उपजिल्हा अध्यक्ष नितीन सावंत, जिल्हा संघटक महिला सौ सुवर्णा जोशी, जिल्हा सल्लागार रियाज बुबेरे, सह संपर्क प्रमुख भाई शिंदे, खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, आदी उपस्थित होते...


Post a Comment
0 Comments