कर्जत प्रतिनिधी (सुभाष ठाणगे). कर्जत बेंडसे उल्हास नदीच्या पात्रात एक मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने कर्जत पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते.पण सापडलेल्या मुक्तदेवाची लोक अखेर पटली असून मृत व्यक्तीचे नाव बालू रतन पवार वय (५०) पन्नास वर्ष असून ते डोणेवाडी गौरकामत गावात रहिवासी होते.
दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसलदार पावसामुळे ही घटना घडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बालू रतन पवार यांच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली आहे .सध्या नातेवाईक हे मृत व्यक्ती सोबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आहेत. शव विच्छेदन प्रक्रिया सुरू आहे, बाळू पवार यांचा मृतदेह उल्हास नदी पात्रात सापडल्यामुळे गावात शोककला पसरली आहे त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय आणि गावकरी अत्यंत दुःखी आहेत मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने तरी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसलदार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहेत.



Post a Comment
0 Comments