कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; संपूर्ण महाराष्ट्रात आनंदात साजरा केला जाणारा वारकरी सांप्रदाय, यांच्ये कैवारी, आषाढी एकादशी, गावागावात, मंदिरात, शाळेत, महाविद्यालय, विद्यालय, अश्या सर्व ठिकाणी आषाढी एकादशी मोठ्या उस्थहात साजरी केली गेली,
त्याच प्रमाणे कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चींचवली गावाच्या हद्दीतील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत सुद्धा आनंदात साजरी करण्यात आली. माऊलीचा गजर करत वारकरी पोशाखातील मुलांनी यांच्या अभंगवाणीने गजबजली, शाळेतून निघालेली पालखी विठ्ठल रखुमाई, ज्ञानबा तुकाराम, जयघोष करीत दिंडी काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी भजने, गाणी ताला सुरात म्हणून गजर केला. भजन, टाल, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले.
संस्थेचे संस्थापक श्री दिलीप जेठे सर व सहकारी यांच्या पुढाकाराने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मतिमंद मुलांनी आषाढी एकादशी आनंदात अती उस्तहात साजरी केली. त्या निमित्ताने मुलांनी पाढरे वस्त्र परिधान करून मुलांनी चांगल्या प्रकारे तय्यारी करून भाव भक्तीने विठ्ठलाची पूजा करून मुलांची दिंडी वरी काढण्यात आली, स्थानिक महिला मंडलाने, प्रवचन कीर्तन साजरा केला, त्यावेळी संस्थेच्या वतीने महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यांचे आभार मानले गेले....

Post a Comment
0 Comments