कर्जत प्रतिनिधी (रुपेश कदम) . कर्जत तालुक्यातील उक्रुल ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होत असल्याची लेखी तक्रार तेथील नागरिकांनी कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती.२६ जून २०२४ रोजी ८२ हजार ११७ रुपयांची रक्कम स्वराज्य ट्रेडर्सच्या पापड मशीन खरेदीसाठी ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून देण्यात आली आहे.परंतु या रकमेतून कोणतीही वस्तू ग्रामपंचायतकडे उपलब्ध करण्यात आलेली नाही. तसेच या रकमेचा व्यवहार करताना कोणत्याही सदस्यांना विचारात घेतले नाही. असे तक्रारदारांचे म्हणणं आहे.
या रकमेचा भ्रष्टाचार हा ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संमतीने करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. १४ जुलै २०२४ रोजी अंगणवाडीतील मुलांना गणवेश खरेदीसाठी 20 हजार रुपयांची रक्कम स्वराज्य ट्रेडर्स यांना देण्यात आलेली आहे ,परंतु मागील तीन वर्षापासून अंगणवाडीतील मुलांना कोणताही गणवेश वाटप करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे उक्रुल ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून ९०% रक्कम फक्त एकच नावे म्हणजे स्वराज्य ट्रेडर्स यांच्या नावे देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान ग्रामपंचायतच्या या व्यवहाराची ऑनलाईन तपासणी केली असता हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनात आल्याची चर्चा जेव्हा गावाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गावामध्ये पसरली तेव्हा पापड मशीन उपलब्ध करून देण्यात आली असे गावकरी सांगत आहेत.
उक्रुल ग्रामपंचायत मधील शिवाजी गोसावी, विलास खडे, रूपाली थोरवे ,प्रमिला सावंत, प्रियंका खडे ,सायली भोईर ,खादी नागरिकांनी याबाबत तक्रार कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्या ंकडे केली आहे.
उक्रुल ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक संगणमताने आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार करीत असल्याचाही आरोप तेथील नागरिक करत आहेत. या तक्रारीनंतर कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे उकरून ग्रामपंचायत मधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाऊसाहेब लोहकरे (उकरून ग्रामपंचायत ग्रामसेवक)
उकरून ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ 30 महिला बचत गट असून मशीन कोणत्या बचत गटाला द्यायची हा आमच्याकडे प्रश्न होता. त्यामुळे ते मशीन देण्यास विलंब झाला. आर्थिक तरतूद कमी असल्याने त्याप्रमाणे अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments