कर्जत प्रतिनिधी..... अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, संघटनेच्या प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुरेश साळोखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झाडे लावण्यात आली.
तालुक्यात विविध ठिकाणी अनेक समाजयोगी उपक्रम अ.सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने करण्यात येत आहेत. मग त्यामध्ये आरोग्य शिबिरे, स्वछता अभियान, शालेय शैक्षणिक साहित्य, शासकीय दाखले, , ज्येष्ठ नागरिक,वृद्ध महिला, पोलिस कर्मचारी, जन जागृती निर्माण करणे, त्यातच या वेळी संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव यांच्या पुढाकाराने प्रदेश युवक अध्यक्ष सुरेश साळोखे यांच्या वाढदिवसाच्या वेळी वड, पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, यांसारखी झाडे लाऊन साजरा करण्यात आला.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अगला वेगळा हा उपक्रम करून जनतेस आवाहन केले की समाजात असेच कार्यक्रम राबविले पाहिजेत त्या मुळे पाण्याची पातळी वाढली जाईल आणि झाडे जगली जातील त्या मुळे वातावरणातील ओक्सिजन चे प्रमाण वाढले जाईल, या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, तालुका सदस्य संतोष सकपाळ, संदेश साळोखे, संतोष पवार, महिला युवक अध्यक्षा प्रची मॅडम, उमेश साळोखे, हर्षद पिंगळे, दर्शन साळोखे, मंगेश पडवलआदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments