Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यातील नसरापूर हद्दीतील सालवड येथे सापडले बेवारीस महिलेचे प्रेत

कर्जत प्रतिनिधी.. कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावाच्या नसरापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या आतील भागात एका झाडाला लटकलेले महिलेचे पंजाबी ड्रेसमध्ये प्रेत आढळून आलेले दिसून आले. साधारण वय 35 च्या आसपास. त्यामुळे परिसरात एकच खलबल उडाली आहे. चेहऱ्यावर ऍसिड अथवा केमिकल टाकून चेहरा ओळखता येणार नाही अशा अवस्थेतील चार-पाच दिवस आधीचे असलेले प्रेत एका ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने स्थानिक पोलीस पाटील यांना माहिती मिळताच त्वरित पोलीस पाटील यांनी कर्जत पोलीस ठाण्यात खबर दिली.

    कर्जत पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. सदर प्रेत शवईच्छेदनसाठी नेले असता कर्जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक तपास कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Post a Comment

0 Comments