Type Here to Get Search Results !

कर्जत पोलिसांची धडक कारवाई ! अखेर 12 तासांच्या आत अटक.

कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव). कर्जत तालुक्यातील अमराई परिसरातील राजनोव्हा सिनेमा गृहातील किमती वस्तूंची चोरी झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्या नंतर, कर्जत पोलिसांनी या चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ८२ हजार रुपयांच्या मालाची चोरी उघडकीस आणली. या घटनेत चोरट्यांनी थिएटर मधील डॉल्बी साऊंड, बॉक्स एम्पलीफायर, व इतर साहित्य चोरले होते. या प्रकरणी राजनोव्हा थिएटर च्या मालकाने  कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्या नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला.

     हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक, डी टी टेले, व पो. नी. सुरेंद्र गरड, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण शाखेची दोन पथके निर्माण करण्यात आली. यात पी एस आय सतीश शिंदे, पो. हवालदार समीर भोईर स्वप्निल  एरुळकर ,अनिल वडते, पो नाईक. संतोष साळुंखे, केशव नागरगोजे, पोलीस शिपाई गणेश पाटील, आकाश राठोड, भरत पवरा, रोहित खरात या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता या सर्वांना पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments