कर्जत प्रतिनिधी.. (प्रफुल जाधव). आशियाई पॅसीपीक पॉवर लिपटिंग स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेळू गावाची सुकन्या आणि भारताचे नेतृत्व करणाऱ्या अमृता भगत हिने १३ जुलै रोजी झालेल्या बेंचप्रेस प्रकारात ४७ किलो वजनी गटात १२२.५ किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकले आहे.
अमृता आणि रायगड जिल्हा पॉवर लिपटिंग असोसिएशन ची खेळाडू अमृता राष्ट्रीय पावर लिफ्टिंग पट्टू म्हणून सध्या सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन शिप मध्ये सहभागी झाले आहे. मागील वर्षातील ही तिची दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून दोन्ही स्पर्धेत पदके मिळवणारी पावर लिफ्टर असून भारताची स्ट्रॉंग वुमन म्हणून ती प्रसिद्धीला येत आहे. अमृता ज्ञानेश्वर भगत. ही सध्या साऊथ आफ्रिका सुरू असलेल्या आशियाई पॅसिपीक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये सहभागी झाली असून २००१ मध्ये जन्मलेले अमृता भगत हिने या कामगिरीबद्दल अशीयाई पॅसिपी आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडलिस्ट ठरली आहे. भारताची राष्ट्रीय पॉवरलिफ्ट अमृता हिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशाला गवसणी घातली आहे.

Post a Comment
0 Comments