कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव). कर्जत तालुक्यातील तब्बल ५४ ग्रामपंचायत पैकी २५ ग्रामपंचायतिच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. आर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमधील लोकांनीयूक्त प्रतिनिधी यांच्या मुदती संपल्याने या सर्व ग्रामपंचायती मध्ये आता प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आता या वर्षा अखेरीस निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने तालुक्यात किमान 30 ग्रामपंचायती मध्ये एकाच वेळी सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात डिसेंबर महिन्यात नेरळ, उमरोली, वाकस, वरई , तीवरे, या ग्रामपंचायतीत लोकांनीयुक्त सदस्यांची मुदत संपनार आहे. तर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील पाथरज, शिरसे, रजपे,, वारे, कशेले, जांबरुक, आसल, माणगाव तर्फे वरेडी, शेळू, पिंपळोली, मानिवली पाशाने, बीड बुद्रुक ,सावेले, हेदवली, मोग्रज, बोरिवली ,आंजप, चिंचवली, भालीवडी, हलीवली,, पलसदरी, ममदापूर, खांडपे, किरवली. या सर्व ग्रामपंचायतच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या होत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कदाचित राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित ग्रामपंचायत निवडणूका होऊ शकतात. मात्र मार्च 2023 पासून जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या मुदती देखील संपल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग कधी घेणार याकडे देखील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Post a Comment
0 Comments