Type Here to Get Search Results !

लोणावळा येथील भुशी धरणात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले.....


 लोणावळा प्रतिनिधी... लोणावळ्यातील भुशी धारणा परिसरातील ब्याक व्हाटर धबधब्या मध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत.

    हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील असून चार लहान मुलांसह एक महिला पण्याय वाहून गेली आहे. त्यातील तिघां जणांचा मृतदेह आढळून आले आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे.

    या मध्ये शाहीस्ता लियाकत अन्सारी वय ३६, आमिदा आदीलअन्सारी वय १३, अदनान सभाहत अन्सारी वय ४ वर्ष, मारिया अकील सय्यद वय ९ वर्ष, उमेरा आदील अन्सारी वय ८ वर्ष, असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा अमिमा आणि उमेरा या दोन मुलींचा मृतदेह सापडला आहे, तर दोन मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. लोणावळा पोलिस व शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडालेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

  पुण्यातील हडपसर भागातील सय्यद नगर मधील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते, त्या वेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाच जण प्रवाहात उतरले. मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सात ही जन पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहून गेले, यातील एक पुरुष आणि एक मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यशआले आहे. मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले...

Post a Comment

0 Comments