कर्जत प्रतिनिधी (गोविंद सांबरी) : पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन पर्यटनाच्या गर्दीने ओसंडून वाहणारं आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने आज नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आठ दिवस आधीच नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास थांबणार आहे आज आठ जून पासून नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर जात असून मिनी ट्रेन चा प्रवास १५ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वे ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे.
नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालवली जाणारी प्रवासी वाहतूक हंगामातील शेवटची ट्रेन असणार आहे. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असताना थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरान मध्ये खूप आहे.
माथेरान-अमन लॉज दरम्यान शटल सेवा खालील वेले नुसार चालवली जाणार आहे.
माथेरान येथूना अमन लॉज करिता ; ०८-२०,०९-१०,११-३५,०२-००,०३-१५,०५-२०, शनिवार रविवार १०-०५,०१-१०. तसेच
अमन लॉज स्थानकापासून माथेरान करिता.;
०८-४५,०९-३५,१२-००,०२-४५,०३-४०,०५-४५. शनिवार रविवार १०, ०१-३५. या प्रकारे असेल.


Post a Comment
0 Comments