कर्जत ( मोतीराम पादिर); कशेले खांडस राज्यमार्ग रस्त्या लगत अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या ठिकाणी असलेल्या वळणावर रिक्षाला अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एक प्रवासी जखमी झाला आहे.
कशेले खांडस रस्त्यावर अपघातात रिक्षा नं.mh४३:bf ९३१६ ही रिक्षा अती वेगाने असल्या मुळे वेगावर नियंत्रण राहिले नसल्याने अपघात झाला आहे. अपघातात रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला कोसळली आहे. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तर रिक्षा मधून प्रवास करणारा एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
पुणे येथून देहू रोड येथील ही प्रवासी रिक्षा खांडस जवळील एका फार्म हाऊसवर पर्यटकांना घेऊन जात होती या रिक्षाला झालेल्या अपघातात सुरेश दगडू वाघमारे हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, या अपघातात जखमी झालेल्या वाघमारे यांना कशेले येथील ग्रामीण रग्णालयात दाखल करण्यात आले त्या नंतर पुढील उपचारासाठी पनवेल येथील mgm रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कर्जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments