कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव): कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायत मधील लाखाची वाडी येथे एका ट्रक ने विजेच्या खांबाला दिलेल्या धडकेमुळे तिन खांब कोसळले आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे चार घरांचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांना घरासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी तत्काळ मदत उपलब्ध करून दिलीआहे.
भालीवडी ग्रामपंचायत मधील लाखाची वाडी ही आदिवासीं वाडी सावले रस्त्यावर आहे, हेदवली सावले गावाकडून येणाऱ्या ट्रकने लाखाची वाडी येथील एका खांबाला धडक दिली, त्यामुळे आदिवासी वाडीमधील तीन विजेचे पोल तारांसह खाली कोसळले आमदार थोरवे यांनी दिर्घटनास्थली वाडीची तत्काळ पाहणी करून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दिद्युत पुरवठा पूर्वरत करण्याचे आदेश दिले. ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याचे आदेश, तसेच २४ तासाच्या आत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत अश्या आदिवासी कुटुंबांना महेंद्र थोरवे फाऊंडेनचा मार्फत मदत पोहचविण्याचे आश्वासन दिले. या वेळी तालुका संपर्क प्रमुख शाम पावली, विभाग प्रमुख प्रफुल म्हसे, जिल्हा परिषद संपर्क प्रमुख संजय गंगावणे, राजेश गंगावणे, भानुदास धुळे, विलास मोडक, योगेश कांबरे, महेश गंगावणे, कैलाश काळोखे, स्वप्नील खैरे, योगेश काळोखे, आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments