कर्जत प्रतिनिधी (कैलास पवार). कर्जत तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली असून तालुक्यातील वदप आदिवासी वाडीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही लग्नाआधीच दोन महिन्यांची गरोदर राहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या गुन्ह्यात वदप आदिवासी वाडीतील १८ वर्षीय तरुण विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील वदप या आदिवासी वाडीत राहणारा १८ वर्षीय तरुण करन पवार या तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. मुलगी अल्पवयीन असताना देखील तिच्यावर वारंवार अत्याचार होत राहिल्याने मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलगी ही २ महिन्याची गरोदर असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पनवेल येथील राहणारे फिर्यादी रायगड चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक प्रकाश नामदेव पवार यांनी याबाबत कर्जत पोलिस स्टेशन चे अधिकारी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गरड यांना माहिती देताच गरड यांनी घटनास्थळी भेट दिली. तर वादप आदिवासी वाडीतील राहणारा १८ वर्षीय तरुण करन पवार या तरुणा विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात कलम ३७६ सह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Post a Comment
0 Comments