कर्जत प्रतिनिधी... कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मंडळाची मदत संपली असून सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागू आहे. परंतु प्रशासकाच्या दुर्लक्ष पणामुळे ग्रामपंचायत मधील सर्व गावांमध्ये अनाधिकृत कामांचा सुळसुळाट वाढला आहे. तर प्रशासक हे बघ्याची भुमिका घेत आहेत.
अनाधिकृत बांधकामे वाढत आहेत, त्यासाठी प्रशासकाच्या कामाबद्दल गटविकास अधिकाऱ्यांना महेश भगत यांच्या कडून तक्रार करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी गावठाण, गुरुचरण, जागेवर्ती अनाधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. या कडे ग्रामपंचायत या प्रशासक यांची बघ्याची भूमिका दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी येते म्हणून येथील लोक रस्त्यावर प्लॅस्टिक बांधत असतात त्या प्लॅस्टिक चे रूपांतर पावसाळ्यानंतर पक्क्या स्वरूपात घरांमध्ये होत आहे. परंतु या सर्व गोष्टीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या समस्या उद्भवणार आहेत हे नाकारता येत नाही.

Post a Comment
0 Comments