Type Here to Get Search Results !

तिघर येथील तरुणावर प्राणघातक हल्ला..१२ जणांवर गुन्हा दाखल.


 कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) .. कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत मधील तिघर येथील अनिल हरीचंद्र देशमुख यांच्यावर जमिनीच्या वादातून हल्ला झाला. गाडी अडवून लोखंडी सल्याने जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जखमी तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेची नोंद कर्जत पोलिस ठाण्यात झाल असून जखमी अनिल देशमुख यांच्या जिवे मारण्यासाठी बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. हल्ला केल्या नंतर ते सर्व ५ जण होंडा सिटी गाडीमधून पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत.

   पळसदरी ग्रामपंचायत मधील तिघर या गावातील एकाच कुटुंबातील लोकांचे वडिलोपार्जित जमिनीचे वाद काही गेली वर्षे सुरू आहेत याच्या वादातून २५ जून रोजी सकाळी अनिल देशमुख हे आपल्या कामा निमित्त आपल्या कार मधून नागुर्ले येथून भिलवले मार्गे जात असताना त्यांची कारसमोर होंडा सिटी कार आडवी घालून पाच अनोळखी तरुणांनी  त्यांना अडवले आणि त्यांच्यावर तसेच त्यांचे चालक रोहिदास सागर मोहिते यांवर लोखंडी रॉड च्या साहाय्याने हल्ला चढवला त्यानंतर मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत अनिल देशमुख यांना सुरवातीला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

      मारेकरी हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच गावात राहतात. त्यानी अनिल देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाणे येथे जखमी अनिल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी हे फरार असून, यामध्ये गजानन बाळाराम देशमुख, जयंत गजानन देशमुख, प्रशांत सूर्यकांत देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, विवेक विश्वनाथ देशमुख, सचिन देशमुख, हे सर्व रा. तिघर, यांच्या सह होंडा सिटी मधून आलेल्या पाच अनोळखी गुंडांचा समावेश आहे..

Post a Comment

0 Comments