संभाजी नगर प्रतिनिधी ; शिलिंभजन डोंगरावर दत्तमंदिरा जवलील मोकळ्या जागेत कार पार्किंग केली असता एका लेडीज ने आपली गाडी रिव्हर्स घेऊन रील बनवण्यासाठी तिने गाडी मागे घेत असताना हा अपघात घडला आहे. रिल्स बनवणे पडले महागात असे तेथील पर्यटकांच म्हणणं होतं.
सोमवारी दुपारी २:०० ते २:३० दरम्यान ही घटना घडली आहे. रिल्स बनवण्यासाठी त्या महिलेने आपली टोयाटो इटिऑस गाडी mh २१Bh०९५८ गाडी मित्राला सांगून मी ही कार चालऊन बघते असे म्हणत रिल्स बनवण्याच्या नादात तिने रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरून खाली दरीत कोसळली. दरीत गेलेल्या कार ला तेथील फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बघितले त्याच वेळी स्थानिक पोलिस स्टेशन शी संपर्क साधून तत्काळ पोलिस यांनी घटना स्थळी पोचून दरीत उतरून युवतीला बाहेर काढले गेले व तत्काळ पंचनामा करून खुलताबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घडलेल्या या अपघातातील मृत युवतीचे नाव श्वेता दीपक सुरवसे वय २३ रा. हनुमान नगर छत्रपती संभाजी नगर तर शिवराज संजय धुळे २५. रा हनुमान नगर. जर या ठिकाणी मंदिर परिसरात संरक्षण भिंत ( कठाडा) असता तर अपघात झाला नसता व नक्कीच या मुलीचे प्राण वाचले असते असे म्हणणे तेथील पर्यटक व प्रत्यक्षदरशनी म्हणत होते. अधिक तपास संभाजी नगर पोलिस ठाणे अधिकारी करत आहेत.


Post a Comment
0 Comments