कर्जत. प्रतिनिधी (प्रफुल जाधव): कर्जत खालापूर विधानसभा मतदासंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिव संवाद बैठक दौरा सुरू असून दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतना दिसत आहे. तसेच दौऱ्याच्या निमित्ताने गावातील ज्येष्ठ शिवसैनिक यांचा सन्मान करण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रायगडचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून हा दौरा सुरू केला आहे. कर्जत तालुक्यातील हा दौरा आटोपल्या नंतर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील समस्या जाणून घेतल्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, जे प्रश्न आमच्या पातळीवर सुटतील ते सोडविणार आहोत आणि जे उर्वरित प्रश्न पुढे पक्षाच्या माध्यमातून सोडविणार आहोत असल्याचे अस्वसान उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी म्हटले आहे.

Post a Comment
0 Comments