कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव); कर्जत तालुक्यात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते, अनेक दशकांचा अंदाज पाहता मान्सून ची सुर्वात ७ जुन रोजी होते. त्यामुळे भाताचे राब शेतकरी शेतकरी वर्ग तयार करण्यास घेतात, कर्जत मधील शेतकऱ्यांनी आपली राब पियरणीची कामे पूर्ण केली आहेत. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
भाताचे बियाणे जमिनीच्या वर आले आहेत, अनेक ठिकाणी भाताच्या राबामुळे शेतातील काही भाग हिरवागार दिसू लागला आहे. भाताच्या शेतीचे कोठार म्हणून कर्जत तालुक्या ची ओळख आहे. भाताच्या राबासाठी लागणारे पावसाचे पाणी बऱ्या पैकी शेतात साचले आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना शेतात टाकण्यात आलेल्या राबाचे चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. आणि या मुळे शेतकरी बळीराजा खुश झाला आहे.

Post a Comment
0 Comments