कर्जत प्रतिनिधी.. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या वतीने नुकताच कर्जत तालुक्यातील समाजसेवक व या संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु.प्रफुल मनोहर जाधव यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संघटनेच्या माध्यमातून प्रफुल जाधव यांनी अनेक उपक्रम राबवून समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर राबवणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत, मतिमंद मुलांसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान, जनजागृती, यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी तालुक्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून राबवून संघटनेचे नाव व आपले व आपल्या गावाचे नाव मोठे केले आहे.
गेली तीन-चार वर्षांपासून ते समाज कार्यात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व मित्रमंडळी ,नातेवाईक यांच्याकडून प्रफुल जाधव यांच्यावर शुभेच्छा आणि त्यांचं कौतुक केलं जात आहे.
प्रफुल जाधव ; संघटनेच्या अध्यक्षांच मी मनापासून आभार व्यक्त करतो, मी केलेल्या समाजकार्याची संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या कामाची पोच पावती म्हणून त्यांनी पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया "समाज रत्न पुरस्कार" 2024 या पुरस्काराने मला सन्मानित केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.
समाजामध्ये तलागालात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते समाज प्रबोधनकार, पत्रकार, डॉक्टर, कीर्तनकार ,प्रवचनकार, भजनी कलाकार, समाजसेवक, यांसारख्या मान्यवरांचा दरवर्षीप्रमाणे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे . तर यावर्षी प्रफुल मनोहर जाधव यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले...


Post a Comment
0 Comments