Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व वृक्षांच संवर्धन करण्यात आले...

 

कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण); ५ जून जागतिक पर्यावरण दिन, या दिनाच्या निमित्ताने. अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस  फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून कर्जत येथे वृक्ष रोपण व लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यात आले.

     कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर व तालुक्यात सर्वत्र ठिकाणी आपल्या सामाजिक कार्यात चर्चेत राहणारी एकमेव संघटना ओळखली जाते. संघटनेच्या वतीने तालुक्यात अनेक ठिकाणी उपक्रम राबविले जातात त्यात मोफत आरोग्य तपासणी, स्वच्छ ता अभियान, शालेय विद्यार्थी यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिक यांसाठी शिबिरे, वृक्ष रोपण, नुकसान ग्रस्थ व पुर ग्रस्थ यांना मदत, "झाडे लावा झाडे जगवा"ही मोहीम हातात घेऊन तालुक्यात वृक्ष लागवड केली जाते .


       झाडे लावा झाडे जगवा," वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती"या ओविनुसार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली मोहीम यशस्वी केली, मागील वर्षी.१५ ऑगस्ट दिनी सहकारी मित्र व कर्जत प्रभात न्युज पेपर चे संपादक श्री जयेशजी जाधव यांच्या खासगी जागेत वृक्ष रोपण केले होते, झाडे चांगल्या प्रकारे मोठी झाली आहेत. झाडांना बाजूला माती ची भरणी करून सभोवताली माती टाकून विटांचा आधार दिला आहे.

    जागतिक पर्यावरण निमित्त राज्यात अनेक संस्था, संघटना, ट्रस्ट, फौंउडेशन, सामाजिक संस्था, आपल्या आपल्या परीने सगळीकडेच मोठ्या संख्येने वृक्ष रोपण करतात, परंतु जी लावलेली झाडे यांचं पुढे काय झाले ? ती झाडे जगली आहेत का , की वणव्यात होरपलून गेली याचा कोणी विचार केला का ? तर नाही. फक्त वृक्ष रोपण करताना उदगार काढले जातात एवढी तेवढी झाडे लावली, त्या पुढे काही नाही.

       राज्यात पाण्याच खूप मोठ संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या आजू बाजूच्या परिसरात, अंगणात, गुरचरन, गावठाण, जागेत ,वनविभागाच्या जागेत, मोठ्या संख्येने वृक्ष लागवड केली पाहिजे, झाडे जगली तर जमिनीत पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि पण्याच संकट ही दूर होईल.

   (यामुळे नागरिकांना संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की सर्वांनी मिळून या वर्षी खूप मोठ्या संख्येने "झाडे लावा झाडे जगवा"ही मोहीम हाती घ्या व नुसती झाडे लावू नका तर ती झाडे जगवा असे आव्हान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी नागरिकांना केले आहे.)

पत्रकार जयेशजी जाधव : खरोखर या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात चांगलं काम केलं जातं आहे, काही ठिकाणी फक्त आपल्या प्रसिद्धी मिळावी म्हणून वृक्ष रोपण करतात,पण नंतर त्या वृक्षां कडे कोणी ढूकुन पण बघत नाही,पण या संघटनेच अस काही नाही,  वृक्ष रोपण करतात आणि पुन्हा येऊन त्यांचं सावर्धन करतात.

  या वेळी संघटनेच्या माध्यमातून वृक्ष रोपण तसेच मागील वर्षी लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यात आले. त्या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ विशाल बनसोडे, संपादक जयेशजी जाधव, तालुका युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, सेल अध्यक्ष श्री शांताराम मिरकुटे व कैलाश पवार, उपाध्यक्ष गोविंद सांबरी, युवक महिला अध्यक्ष प्राची जाधव, उपस्थित होते....

   

Post a Comment

0 Comments