Type Here to Get Search Results !

भक्ताच्या वाडीतील जुन्या पाण्याच्या टाकीमुले घडू शकते मोठी दुर्घटना...

 

कर्जत... प्रतिनिधी (मोतीराम पादिर) : कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताची वाडी येथील नळ पाणी योजनेची पाण्याची टाकी सन २००५ मध्ये बांधण्यात आली होती. ती टाकी पूर्ण पने जीर्ण झाली आहे.

        तशी ती टाकी अती धोकादायक बनली असून, शेजारील घराना तसेच बाजूलाच लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेजवळ असलेली टाकी शाळेवर कोसलून दुर्घटना घडू शकते. होणारी ही दुर्घटना टाळण्यासाठी जुनी टाकी पाडून होणारे नुकसान तसेच दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायती कडे केली जात आहे.


     ग्रामस्थांकडून वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात पत्र व्यवहार करून सुद्धा या कडे दुर्लक्ष केले जात आहे असे ग्रामस्थ यांच्या कडून सांगण्यात आले आहे. 

           (ग्रामविकास अधिकारी - रंभाजी संभाजी श्रीखंडे, भक्ताची वाडी गावातील जुनी टाकीची तक्रार ग्रामपंचायती कडे आली आहे, आम्ही पंचायत समिती व बांधकाम विभाग यांच्या कडे नवीन पत्र बनऊन दिले आहे, लवकरच चौकशी करून काय तो निर्णय आमच्या पर्यात येईल, तशी टाकी पडण्याची कार्यवाही केली जाईल.)

     ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील या जुन्या टाकीची दाखल घेतली जात नसल्याने जर वेळेत टाकी पडली नाही तर शेजारी राहणाऱ्या लोकांना व अंगणवाडीत शिकायला येणाऱ्या मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो. तर या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत व प्रशासन असेल. असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. दुर्घटना टाळण्यासाठी वेळीस उपाय योजना करून टाकी पाडावी अशी मागणी ग्रामस्थ ग्रामपंचायत व प्रशासनाकडे करत आहेत...

Post a Comment

0 Comments